प्रवास
उन्हाळ्याचे दिवस होते ते. मी ऑफिसच्या कामानिमित्त चेन्नईला गेलो होतो. साधारण ३ दिवसाचं काम होत. पण नियतीच्या मनात काय असतं ह्याचा काही नेम आहे का ? नियती ही अथांग समुद्रासारखी असते. त्याचा कधी कोणाला थांगपत्ता तरी लागला आहे का ? पण असो… एकीकडे चेन्नईतील प्रखर ऊन आणि हवेतील आर्द्रता यामध्ये जणू युद्ध चालू होत की सगळ्यात वरचढ कोण ठरणार. घामाच्या धारा वाहत होत्या. २ दिवसातच मला समजलं की शरीर साथ देत नाही आहे. तब्येत खराब होत चालली आहे. थकवा जाणवतोय. ठरल्याप्रमाणे चौथ्या दिवशी निघायचं होत तिथून. पण चेन्नई ते पुणे डायरेक्ट ट्रेन मिळाली नाही. म्हणून बँगलोरवरून ट्रेन होती रात्रीची.
सकाळी बसने चेन्नई ते बँगलोर प्रवासाला सुरवात झाली. पण तो प्रवास मला कुठवर नेऊन ठेवणार होता हे मला तरी कुठे ठावूक होत. तब्येत मात्र तशीच होती. आता तर काही खाल्लं ही जातं नव्हतं. बसमध्ये बसणे असह्य झालं होत. झोपायचा प्रयत्न केला तर ती काही येत नव्हती.वाटत होत की पोहोचेन की नाही मी पुण्याला. छे ! पुण्याला नव्हे, बँगलोरला पोहचलं तरी खूप होत माझ्यासाठी. तो ६–७ तासाचा प्रवास माझा जीव घेतो की काय असं वाटतं होत. आणि मग पुढे ट्रेनचा २०–२२ तासाचा प्रवास ? एक एक क्षण एक एक तासासारखा वाटतं होता. कसातरी बँगलोरला पोहचलो.

प्लॅटफॉर्मवर ३ तास आधी पोहचलो होतो. पण तब्येतीत काही सुधारणा नव्हती. पूर्ण दिवस लिंबू पाण्यावर काढल्यामुळे थकवा जाणवत होता. अजूनही काही खावं असं वाटतं नव्हतं. काही काळ असाच निघून गेला बाण लागलेल्या श्र्वापदासारखा…
थोड्या वेळाने एक उंच अशी आकृती माझ्या समोर येऊन बसली. आकृती नव्हे , माणूसच होते ते. पण खरंच माणूसच होते का ते? छे ! मला नसतं सांगता आल, कदाचित कोणालाच नसतं सांगता आल ते. उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी होती ती. ते माझ्या समोर उभे राहिले असते तरी मला त्यांच्याकडे मान वर करून बघावं लागलं असतं इतकी उंची होती त्यांची. तस म्हटलं तर वयस्कर साधू होते ते. डोक्यावर केस नव्हते, भव्य मोठं कपाळ, कपाळावर लाल रंगाचा टिळा, चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. नजर कमालीची स्थिर होती. चेहऱ्यावर विलक्षण तेज होत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. अंगावर कपडे नव्हते, फक्त एक धोतर नेसल होत. हात नेहमीपेक्षा जरा जास्तच लांब होते. आजानुबाहू म्हणतात ना तसं. माझ सारखं लक्ष त्यांच्याकडेच जात होत. कोणत्यातरी गूढ विचारात होते ते असं जाणवलं मला. एकाच ठिकाणी टक लावून बघत होते. मी जरी एखाद्याला सांगितलं असतं की तिथे एक पुतळा ठेवला आहे तरी ते त्याने मान्य केलं असतं. पण कोण होते ते? एक नुसता पुतळा, की एक माणूस, की फक्त एक साधू, की अजून कोणी? हे तर मला सांगता येणं शक्य नव्हतं, शेवटी मी एक साधारण माणूस होतो. मी हळू हळू माझा विचार करणं सोडून दिलं होत. अस तब्बल २ तास चाललं. मन शांत होत चाललं होत आणि तब्येत सुद्धा, मला ते जाणवत होत.
शेवटी ट्रेन यायची वेळ आली. मी त्यांच्याकडे पाहिलं तरी ते तसेच होते. मी ट्रेनमध्ये जाऊन बसलो. ट्रेनचा डब्बा दूर असल्यामुळे ते माझ्या दृष्टी आड झाले. ट्रेन निघायला सुरवात झाली. मी आवर्जून त्यांना बघण्याचा प्रयत्न केला, पण आता कोणीच नव्हतं तिथे. ट्रेनने हळू हळू वेग धरला, आणि कधी पुणे आल मला कळलं सुद्धा नाही. आणि आश्चर्य म्हणजे मी पुण्याला सुखरूप येऊन पोहचलो होतो.
May 1, 2021 @ 11:13 pm
श्री स्वामी समर्थ ….🙏
खूपच छान लेख …
May 1, 2021 @ 11:33 pm
श्री स्वामी समर्थ
May 1, 2021 @ 11:14 pm
Khup Chan lihil aahes.
Aani tu kadhlel swamich sketch pn khup Chan aahe.
May 1, 2021 @ 11:34 pm
Thank you
May 2, 2021 @ 1:18 am
Nicely putup mandar. You are having good skills
Keep writing..and Sketch is top class
Shri Swami Samartha
May 2, 2021 @ 11:16 am
Thank you for your comment .. Highly appreciated… Shree Swami Samarth
May 2, 2021 @ 8:23 am
Khup chan lihat raha navigation Kalpana suchita jatil
May 2, 2021 @ 11:14 am
Ho thanks
May 16, 2021 @ 7:03 pm
देव हि संकल्पना माणसाच्या मनाला बळ देणार एक औषध आहे. आणि हेच औषध आपल्या निसर्गात आजूबाजूला वावरणार्या माणसात आहे
खुपच सुंदर..👌👌🙏🙏
May 16, 2021 @ 7:09 pm
हो खरं आहे… आणि धन्यवाद 😊