निस्वार्थता – एक जीवन शैली
निस्वार्थ जीवन जगण्यासाठी गरीब , श्रीमंत वर्गीकरण असावं असं काहीच नाही… फक्त माणसाची नियत चांगली असली म्हणजे झालं…आणि हे सगळं करण्यासाठी माणसाने वेगळे असे आवर्जून प्रयत्न करावे असं ही काही नाही… ते आपण आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून पण करू शकतो… आणि मग ती आपली एक जीवनशैली बनलेली असेल… निस्वार्थता एक जीवनशैली..